नाशिक, 15 सप्टेंबर (हिं.स.) : नांदूर नाका येथील राहुल धोत्रे या युवकाच्या खून प्रकरणातील फरार असलेलं माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अखेर गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. राहुल धोत्रे याच्या मृत्यूनंतर निमसे हे फरार झाले होते. त्यांचे शेवटचे लोकेशन पेठ रोडवर आढळले होते. अटक टाळण्यासाठी त्यांनी अगोदर सत्र न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारला होता. त्यामुळे पोलिसांना शरण येण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरलेला नव्हता. आज गुंडा विरोधी पथकाने त्यांना अटक केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV