सोलापूर : ‘एटीएम’ची अदलाबदल करून रोकड लांबविणारे दोघे जेरबंद
सोलापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।बाळे व छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एटीएम केंद्रावर पैसे काढायला गेलेल्या दोघांच्या कार्डची अदलाबदल करून चौघांनी एक लाख १९ हजार ५९३ रुपये लंपास केले होते. फौजदार चावडी पोलिसांत दोन गुन्हे दाखल झाले होते. गुन्हे प्रकटीकर
सोलापूर : ‘एटीएम’ची अदलाबदल करून रोकड लांबविणारे दोघे जेरबंद


सोलापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।बाळे व छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एटीएम केंद्रावर पैसे काढायला गेलेल्या दोघांच्या कार्डची अदलाबदल करून चौघांनी एक लाख १९ हजार ५९३ रुपये लंपास केले होते. फौजदार चावडी पोलिसांत दोन गुन्हे दाखल झाले होते. गुन्हे प्रकटीकरण पथकप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक श्री. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दोन संशयितांना जेरबंद केले आहे.

न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. बाळे परिसरातील संतोष नगरातील श्रीशैल शिवशरण बंबासे हे एटीएम केंद्रावर पैसे काढायला गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी थांबलेल्या चौघांनी पैसे काढून देण्याचा बहाणा करून बंबासे यांच्याकडील एटीएम कार्ड घेतले. त्यानंतर कार्डची अदलाबदल करून पैसे निघत नसल्याचे सांगून दुसरेच कार्ड त्यांच्या हाती सोपविले. त्यानंतर चौघांनी बंबासे यांच्या खात्यातील ७१ हजार रुपये काढले. त्यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande