जळगाव, शेती साहित्याची चोरी करणारी टोळी जेरबंद
जळगाव, 15 सप्टेंबर (हिं.स.) निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शेती साहित्याची चोरी करणाऱ्या सहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून अकरा लाखांचे शेती साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींना 16 सप्ट
जळगाव, शेती साहित्याची चोरी करणारी टोळी जेरबंद


जळगाव, 15 सप्टेंबर (हिं.स.) निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शेती साहित्याची चोरी करणाऱ्या सहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून अकरा लाखांचे शेती साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींना 16 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे तर अर्जुन सोळंकी नामक सहाव्या आरोपीला रात्री बेड्या ठोकण्यात आल्या.पोलिसांनी वडगाव शिवारातील झोपडीतून चोरीला गेलेले शेती साहित्य जप्त केले तर योगीता सुनील कोळी (रा. वडगाव) या महिलेस अटक केल्यानंतर जमील अब्दुल तडवी (रा. वडगाव ता. रावेर), स्वप्नील वासुदेव चौधरी (रा.निंभोरा), आकाश मधुकर गोंधळी, गोपाल संजय भोलणकर (रा. शिरसाळा ता. बोदवड) या चौघांची नावे समोर येताच त्यांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींना रावेर न्यायालयाने 16 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. निंभोरा पोलिस पथकाने आरोपींना सोबत घेत रावेर, बोदवड, भुसावळ तालुक्यात निंभोरा, खिर्डी, न्हावी, चिनावल, करणगाव, शिरसाळा आदी ठिकाणी चोरी केलेल्या मुद्देमाल पुन्हा हस्तगत केला. आतापर्यंत जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 11 लाखांवर आहे. विलास उर्फ कालू सुपडू वाघोदे (रा. वडगाव) मुख्य संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती निंभोरा एपीआय हरिदास बोचरे यांनी दिली. चोरट्यांकडून चोरीचे साहित्य खरेदी करणारेही रडारवर असल्याचे पोलीस अधिकारी यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande