वैयक्तिक हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी करण जोहरची कोर्टात धाव
नवी दिल्ली , 15 सप्टेंबर (हिं.स.)। आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वाढता वापर लक्षात घेता, चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या फोटो आणि आवाजात छेडछाड करून त्याचा गैरवापर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे आता अनेक चित्रपट कलाकार सतर्क झाले आह
करण जोहर


नवी दिल्ली , 15 सप्टेंबर (हिं.स.)। आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वाढता वापर लक्षात घेता, चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या फोटो आणि आवाजात छेडछाड करून त्याचा गैरवापर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे आता अनेक चित्रपट कलाकार सतर्क झाले आहेत.अलीकडेच ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी आपले वैयक्तिक हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनीही दिल्ली उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

करण जोहर यांनी आपल्या व्यक्तिमत्व हक्कांच्या आणि प्रसिद्धी हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे त्यांनी त्यांच्या नावाचा वापर करून बेकायदेशीररीत्या वस्तू विकणाऱ्यांना थांबवण्याची मागणी केली आहे. सोमवारी करण जोहर यांनी ही याचिका न्यायालयात सादर करत आपली ओळख आणि प्रसिद्धी हक्कांचे संरक्षण मागितले. करण जोहर यांची ही याचिका न्यायमूर्ती मनमीत पी.एस. अरोरा यांच्या समोर सुनावणीस आली, जिथे न्यायालयाने त्यांच्या वकिलांकडून काही स्पष्टिकरण मागवले.

करण जोहर यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती मनमीत पी.एस. अरोरा यांनी म्हटले की, “मिस्टर राव, तुम्हाला दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतील. पहिली म्हणजे ‘अपमान’ आणि ती ‘मीम्स’ पासून वेगळी असते. प्रत्येक मीम अपमानकारक असेलच असं नाही. दुसरी बाब म्हणजे, लोक तुमच्या नावाचा वापर करून वस्तू विकत आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं डोमेन नेम. तुम्ही हे सगळं स्पष्टपणे अधोरेखित करा, त्यानंतर न्यायालय या प्रकरणाचा विचार करेल.मात्र, प्रत्येक पेजवर किंवा प्रत्येक मीमवर अशा प्रकारे कारवाई शक्य नाही. प्रत्येक फोटो किंवा मीमचा उद्देश अपमान करणं असतोच असंही गृहीत धरता येणार नाही.”

याचिकेत, करण जोहर यांनी न्यायालयाला विनंती केली आहे की, काही वेबसाइट्स आणि प्लॅटफॉर्म्सना आदेश दिले जावेत की, त्यांनी करण जोहर यांच्या नाव आणि फोटोसह बनवलेले मग, टी-शर्ट आणि इतर वस्तूंची बेकायदेशीर विक्री थांबवावी.

करण जोहर यांच्यावतीने उपस्थित वरिष्ठ वकील राजशेखर राव यांनी न्यायालयात म्हटले, “माझ्या व्यक्तिमत्वाचा, चेहऱ्याचा किंवा आवाजाचा कोणताही अनधिकृत वापर कोणीही करू नये, याची मला खात्री करण्याचा पूर्ण अधिकार आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande