अद्वैत मसूरकर दिग्दर्शित छबी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक दिमाखात लाँच
मुंबई, 15 सप्टेंबर (हिं.स.)। फोटोग्राफी करणारा एक फोटोग्राफर कोकणात एका मुलीचे फोटो काढतो. त्या फोटोंचा एक विचित्र अनुभव त्याला येतो. त्या फोटोंमागे नेमकं काय गूढ असतं याची गोष्ट छबी या चित्रपटातून पाहता येणार आहे. अत्यंत रंजक अशा या चित्रपटाचा ट्रेल
marathi  film Chhabi


मुंबई, 15 सप्टेंबर (हिं.स.)। फोटोग्राफी करणारा एक फोटोग्राफर कोकणात एका मुलीचे फोटो काढतो. त्या फोटोंचा एक विचित्र अनुभव त्याला येतो. त्या फोटोंमागे नेमकं काय गूढ असतं याची गोष्ट छबी या चित्रपटातून पाहता येणार आहे. अत्यंत रंजक अशा या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला. येत्या २५ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

केके फिल्म्स क्रिएशन, उप्स डिजिटल एंटरटेन्मेेंट यांनी छबी या चित्रपटाची निर्मिती केली असून जया तलक्षी छेडा या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत मसूरकर यांचं आहे. चित्रपटात समीर धर्माधिकारी, मकरंद देशपांडे, शुभांगी गोखले, राजन भिसे, संजय कुलकर्णी, लीना पंडित असे अनुभवी कलाकार असून ध्रुव छेडा, सृष्टी बाहेकर, अनघा अतुल, रोहित लाड, ज्ञानेश कदम या नव्या दमाच्या कलाकारांचा उत्तम अभिनयही आपल्याला पहायला मिळणार आहे. मंगेश कांगणे, प्रशांत मडपूवार यांनी लिहिलेल्या गीतांना रोहन-रोहन यांचे संगीत लाभले असून अभय जोधपूरकर रोहन - रोहन यांचा स्वराज लाभला आहे. सिनेमॅटोग्राफर म्हणून रोहन मडकईकर यांनी काम पाहिले आहे.

फोटोग्राफी स्पर्धेसाठी एक तरूण फोटोग्राफराला फोटो पाठवायचे असतात. त्यासाठी तो कोकणात जातो. कोकणात जाऊन एका मुलीचे फोटो काढलेले असतात. प्रत्यक्षात त्या फोटोत कुणीच दिसत नाही. पण त्या फोटोग्राफरला त्या फोटोत मुलगी दिसत असते. या फोटोमागे काय कहाणी आहे ? ती मुलगी कोण असते? या प्रश्नांची उत्तरं मोठ्या पडद्यावरच पाहायला मिळणार आहेत. निसर्गसंपन्न कोकणाच्या पार्श्वभूमीवरची एक गूढरम्य गोष्ट छबी या चित्रपटांतून मांडण्यात आली आहे.

गेल्या काही काळात कोकणाच्या पार्श्वभूमीवरच्या वेगवेगळ्या गोष्टी चित्रपटांतून समोर येत आहेत. त्यातून कोकणाचा निसर्ग, तिथली माणसं, चालीरिती, भाषा यांचं चित्रण केलं गेलं आहे. मात्र या सर्वांपेक्षा छबी हा चित्रपट अतिशय वेगळा ठरणार आहे. म्हणूनच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आवर्जून पहायला हवा.

Trailer Link

https://youtu.be/RyZjhqNQ7VU?si=Me9QcelfTqt0Zrat

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande