सोलापूर जिल्ह्यात १८ सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
सोलापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध होत असून, गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नोकरी इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव
सोलापूर जिल्ह्यात १८ सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा


सोलापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।

जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध होत असून, गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नोकरी इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे.

हा मेळावा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर, मॉडेल करिअर सेंटर सोलापूर, उमा महाविद्यालय पंढरपूर आणि गुरुप्रसाद स्किल डेव्हलपमेंट सेंटर पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

रोजगाराच्या संधी:

या मेळाव्यात १००० हून अधिक रिक्तपदांसाठी १० उद्योजकांनी ऑनलाईन अधिसूचना दिली असून, खालील पात्रता धारक उमेदवारांना संधी उपलब्ध आहे:

- १० वी, १२ वी उत्तीर्ण

- ITI (वेल्डर, फिटर, इलेक्ट्रीशियन)

- डिप्लोमा, कोणतीही पदवी, बी.कॉम, एम.कॉम

- ऑफिस असिस्टंट, मशीन ऑपरेटर इत्यादी

मेळाव्याचे ठिकाण व वेळ:

- ठिकाण: उमा महाविद्यालय, कराड रोड, पंढरपूर

- वेळ: सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत

- दिनांक: गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५

आवश्यक कागदपत्रे:

- रिझ्युमच्या तीन प्रती

- शैक्षणिक व ओळखपत्रांची छायांकित प्रती

अधिक माहितीकरिता संपर्क:

- दूरध्वनी: ०२१७–२९९२९५६

- प्रत्यक्ष भेट: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट पार्क चौक, सोलापूर

- वेब पोर्टल: अधिक माहितीसाठीhttps://orjgar.mahaswayam.gov.iv या वेब पोर्टलला भेट द्यावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande