आगामी जिल्हा परिषद पंचायती समिती निवडणूका जिंका - भरत गोगावले
सोलापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। मोहोळकडे राजू खरे यांच्या माध्यमातून आमदारकीचा नवीन चेहरा आहे. भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये विजय मिळवून सत्ता स्थापन करा आणि त्या माध्यमातून निधी उपलब्ध होईल. त्यामुळे कोणाक
gogo


सोलापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। मोहोळकडे राजू खरे यांच्या माध्यमातून आमदारकीचा नवीन चेहरा आहे. भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये विजय मिळवून सत्ता स्थापन करा आणि त्या माध्यमातून निधी उपलब्ध होईल. त्यामुळे कोणाकडेही निधी मागण्याची वेळ येणार नाही. सर्वांना ताकद देण्याचे काम आम्ही करू, मोहोळच्या विकासासाठी जास्तीत जास्त मदत करू जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केले.

मंत्री गोगावले हे मोहोळ तालुक्याच्या पाटकुल दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शिंदे सेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख चरण राज चवरे यांच्या माध्यमातून तालुक्यातील पाटकूल येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे तसेच जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार राजू खरे म्हणाले, मला मोहोळ मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी 200 रस्ते करण्याची संधी द्यावी व त्यास मंजुरी द्यावी. मतदार संघात आज ही रस्त्यांची अवस्था बिकट आहे. शेतकरी जर शेतातून गावात आला , गावातून तालुक्याला आला , तालुक्यातून जिल्ह्याला आला , तरच त्याला सर्व गोष्टी समजणार आहेत त्यासाठी रस्ते खूप आवश्यक आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande