नांदेड, 15 सप्टेंबर (हिं.स.)।देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त 21 सप्टेंबर रोजी भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे नांदेड येथे नमो युवा रन चे आयोजन करण्यात आले आहे. ही
मॅरेथॉन नशा मुक्त भारत म्हणून ओळखली जाणार आहे. महाराष्ट्रात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांच्या अध्यक्षतेेेखाली भाजपा नांदेड महानगर येथे युवा मोर्चा व नांदेड दक्षिण ग्रामीण उत्तर ग्रामीण ची बैठक नांदेड महानगर संपर्क कार्यालय येथे संपन्न झाली.
तसेच मॅरेथॉन स्पर्धा साठी स्पर्धकांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली.बैठकीस प्रमुख उपस्थिती महामंत्री विजय येवनकर,विजय गंभीरे ,शीतल खांडील, भाजपा युवा मोर्चा मराठवाडा विभागीय प्रभारी अरुण पाठक, युवा मोर्चा प्रदेश सचिव व नांदेड जिल्हा प्रभारी युवराज पाटील चाकूरकर , युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनिलजी पाटील बोरगावकर प्रदेश सचिव अमोल ढगे,श्रुती ताई तुडमे,नांदेड महानगर भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शशिकांत शिरसागर , भाजपा सोशल मीडिया प्रदेश सदस्य चे राजयादव, युवा मोर्चा सरचिटणीस ओम बंडेवार, ग्रामीण सरचिटणीस स्वप्नील गर्डे,देवा पाटील देबडगे ,अर्धापूर युवा मोर्चा अध्यक्ष पवन पाटिल इंगोले,कोमल ताई जैस्वाल यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis