लातूर येथे तालस्पर्श संगीत समारोह 2025” उत्साहात
लातूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।लातूर शहरातील संगीत क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व पं. शांताराम चिगरी गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ “तालस्पर्श म्युझिक अकॅडमी” यांच्या वतीने भव्य “तालस्पर्श संगीत समारोह” आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला रसिक श्रोत्या
अ


लातूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।लातूर शहरातील संगीत क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व पं. शांताराम चिगरी गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ “तालस्पर्श म्युझिक अकॅडमी” यांच्या वतीने भव्य “तालस्पर्श संगीत समारोह” आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात तालस्पर्श अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणाने झाली. यामध्ये स्वतंत्र तबलावादन, गायन, समूह तबलावादन, व समूहगायन सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी केलेल्या दमदार सादरीकरणानंतर उपस्थितांचे मन जिंकले.

यानंतर मुंबई येथून आलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युवा बासरीवादक अवधूतजी फडके यांनी मनमोहक बासरीवादन सादर केले. त्यांनी राग यमन मधील मत्ततालातील बंदिश, तीन तालातील तराना व बंदिश तसेच राग भैरवी मध्ये सादर केलेली धून यामुळे संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले. त्यांना तबल्यावर साथ लाभली ती मुंबई येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे युवा तबलावादक पवनजी सिडम यांची, ज्यांनी अत्यंत बहारदार संगत केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशाल जाधव होते. उद्घाटन शशिकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणराव कुलकर्णी, अंगदराव नेटके, सोनू डगवाले, महेशजी कोल्हे, प्राचार्य विकासजी लबडे, तालमार्तंड प्रकाश बोरगावकर, व विशेष सत्कारमूर्ती म्हणून राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. संदीप जगदाळे यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या शेवटी तालस्पर्श म्युझिक अकॅडमीचे संचालक श्री विश्वनाथजी धुमाळ सर व तेजस धुमाळ यांनी उपस्थित पाहुणे व प्रेक्षकांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकॅडमीतील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande