पुण्यात “आलेख्य” चित्रप्रदर्शनाचे आयोजन
“आलेख्य” चित्रप्रदर्शनात उलगडणार देवी अहिल्यांचे जीवन आणि महाकुंभाचे वैभव पुणे, 15 सप्टेंबर (हिं.स.)। दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने पुण्यात “आलेख्य” चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे
पुण्यात “आलेख्य” चित्रप्रदर्शनाचे आयोजन


“आलेख्य” चित्रप्रदर्शनात उलगडणार देवी अहिल्यांचे जीवन आणि महाकुंभाचे वैभव

पुणे, 15 सप्टेंबर (हिं.स.)। दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने पुण्यात “आलेख्य” चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाला आणि महाकुंभाच्या भव्यतेला समर्पित आहे.

प्रदर्शन १७ ते २२ सप्टेंबर या कालावधीत बालगंधर्व कला दालन, पुणे येथे होणार असून, त्याचे उद्घाटन १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होईल. उद्घाटन समारंभात मुख्य अतिथी म्हणून आमदार चंद्रकांत पाटील, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र दुदी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रोग्राम ऑफिसर सुदर्शन शेट्टी तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सहाय्यक संचालक (कार्यक्रम) दीपक कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका आस्था कार्लेकर यांनी सांगितले की या प्रसंगी विविध कलाकारांनी साकारलेली चित्रे प्रदर्शित केली जातील. या चित्रांत देवी अहिल्यांचे परोपकारी जीवन, समाजसुधारणा कार्य आणि महाकुंभाचे वैभव यांचे दर्शन घडेल. हे प्रदर्शन दररोज सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत कला रसिकांसाठी खुले असेल आणि प्रवेश पूर्णपणे निःशुल्क असेल. आयोजकांच्या मते “आलेख्य” प्रदर्शन भारतीय कला, संस्कृती आणि इतिहासाला जवळून जाणून घेण्याची व अनुभवण्याची एक आगळीवेगळी संधी ठरेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande