पावसामुळे थेऊर येथे घरात अडकलेल्या १५० नागरिकांची सुखरूप सुटका
पुणे, 15 सप्टेंबर (हिं.स.)। शहर आणि जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे हवेली तालुक्यातील थेऊर गावातील रूपे वस्ती परिसरात ओढ्याला पूर आला. पुरामुळे जवळपास १५० लोकांच्या वस्तीत पाणी शिरले. सोमवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर पीएमआर
tht


पुणे, 15 सप्टेंबर (हिं.स.)। शहर आणि जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे हवेली तालुक्यातील थेऊर गावातील रूपे वस्ती परिसरात ओढ्याला पूर आला. पुरामुळे जवळपास १५० लोकांच्या वस्तीत पाणी शिरले. सोमवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर पीएमआरडीएच्या वाघोली अग्निशमन केंद्रातील जवान आणि पीडीआरफ पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने समन्वित कारवाई करत घरांमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले.

पुरामध्ये म्हशी, शेळ्या, कोंबड्या हे पाळीव प्राणी काही प्रमाणात वाचवण्यात आले. तर काही प्राणी वाहून गेले आणि काहींचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली.

दरम्यान सोलापूर रस्ता, लोणी, कदमवाक वस्ती येथे मुसळधार पावसाने घरे, वाहने पाण्याखाली गेली आहेत. इंदापूर आणि बारामतीतालुक्यात देखील मुसळधार पावसाने गावे पाण्याखाली गेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. हडपसर, लोणी काळभोर, कदमवाक वस्ती या भागांना मोठा फटका बसला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande