'अभियंत्यांच्या कल्पकतेतून साकारले सर्वाधिक मृतसाठ्याचे उजनी धरण
सोलापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमूना म्हणून उजनी धरणाकडे (यशवंतसागर) आश्चर्याने पाहिले जाते. माती, सिमेंट काँक्रिट व दगडाने तीन किलोमीटर बांध तयार करून त्यावर ४१ दरवाजे काढण्यात आले आहेत. सर्वाधिक दरवाजे आणि सर्वाधिक मृतसाठा
'अभियंत्यांच्या कल्पकतेतून साकारले सर्वाधिक मृतसाठ्याचे उजनी धरण


सोलापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमूना म्हणून उजनी धरणाकडे (यशवंतसागर) आश्चर्याने पाहिले जाते. माती, सिमेंट काँक्रिट व दगडाने तीन किलोमीटर बांध तयार करून त्यावर ४१ दरवाजे काढण्यात आले आहेत. सर्वाधिक दरवाजे आणि सर्वाधिक मृतसाठा (६३ टीएमसी) असलेले राज्यातील एकमेव धरण म्हणून उजनीची ख्याती आहे. ११ वर्षांत बांधून पूर्ण झालेले धरण ४५ वर्षांतनंतरही तेवढ्याच दिमाखात उन्हाळ्यात टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी हातभार लावत आहे.

पाणी वाटप लवादाच्या निर्णयानुसार कृष्णा खोऱ्यातील ५८५ टीएमसी तर भीमा खोऱ्यातील ९५ टीएमसी पाणी अडविण्यात आले. त्यात उजनी धरणात ८४ टीएमसी पाणी साठविले जाते. पावसाळ्यात उजनीत मोठा विसर्ग येतो, त्यामुळे उन्हाळ्यातील टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी उजनीत १२३ टीएमसीपर्यंत पाणी साठवले जाते. धरण जरी दरवर्षी उणे पातळीत जात असले तरी धरणामुळे दुष्काळी जिल्हा ही सोलापूरची ओळख पुसली गेली आहे. रब्बीच्या जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र उजनी धरणामुळेच वाढले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande