अकोला, 16 सप्टेंबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला जगभरातून शुभेच्छांचा वर्षावर होत असतानाच विंचित
बहुजन आघाडीकडून मात्र पंतप्रधानांवर शेलक्या भाषेत विखारी टीका करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीट्विटरवर मोदींच्या संदर्भात शेलकी भाषा वापरत टीका केलीय.यासंदर्भातील ट्विटमध्ये आंबेडकर म्हणाले की, “सनातन धर्म हा छळछावणी व अस्पृश्यतेचे दुसरे नाव आहे. तो दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिलांना पुन्हा गुलाम बनविण्याची मानसिकता रुजवतो. मोदी हे या व्यवस्थेचे राजा आहेत. यापूर्वी देखील आंबेडकरांनी मोदी सरकारच्या धोरणांवर आणि वैदिक हिंदुत्ववादी विचारसरणीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काँग्रेसने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून पंतप्रधानआणि त्यांच्या दिवंगत आईवर व्हिडीओ बनवला होता. आता पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शेलक्या भाषेत टीका करून प्रकाश आंबेडकरदेखील काँग्रेसच्या मांदियाळीत जाऊन बसले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे