अकोला - ‘सेवा पंधरवडा’चा बुधवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
अकोला, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। महसूल विभागातर्फे नागरिकांच्या अडचणींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी आणि लोकाभिमुख शासन प्रदान करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राज्यात तसेच अकोला जिल्ह्यात ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे. हा
P


अकोला, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। महसूल विभागातर्फे नागरिकांच्या अडचणींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी आणि लोकाभिमुख शासन प्रदान करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राज्यात तसेच अकोला जिल्ह्यात ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम १७ सप्टेंबर २०२५ (राष्ट्रनेता मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन) ते २ ऑक्टोबर २०२५ (राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती) या कालावधीत मोहिम स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ उद्या (१७ सप्टेंबर) सकाळी १० वाजता नियोजन भवन, अकोला येथे राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमावेळी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विकसित करण्यात आलेले **“ई-भूमिती सॉफ्टवेअर”**चे अनावरण देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. जिल्ह्यातील शासकीय जमिनींचा सुसंगत व पारदर्शक डाटाबेस तयार करण्यासाठी हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.

तसेच, कार्यक्रम स्थळी इंडिया रेड क्रॉस सोसायटी व डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सेवा पंधरवड्यातील महत्त्वाचे टप्पे :

1. पाणंद रस्तेविषयक मोहीम (17 – 22 सप्टेंबर, 2025)

शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण व नोंदी अद्ययावत करणे

शेतरस्त्यासाठी संमतीपत्र प्राप्त करणे

प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे

शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे

अकोला जिल्ह्यातील 52 गावे निवडून, 248 रस्त्यांना संकेतांक देऊन सीमांकन पूर्ण करणे

2. ‘सर्वांसाठी घरे’ योजना (23 – 27 सप्टेंबर, 2025)

घरे बांधण्यासाठी उपलब्ध शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करणे

अतिक्रमणाचे नियमन व पट्टे वाटप करणे

3. लोकअदालती व महसूली सेवा (28 सप्टेंबर – 2 ऑक्टोबर, 2025)

प्रलंबित अर्जांवर कार्यवाही करून जिवंत सातबारा अद्ययावत करणे

मंडळ स्तरावर महाराजस्व अभियान राबवून प्रमाणपत्र वाटप

महसूल प्रकरणांचे तडजोडीने निपटारा करण्यासाठी लोकअदालतींचे आयोजन

ई-भूमिती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शासकीय जमिनींचा एकसंध डाटाबेस तयार करणे

जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी आवाहन केले आहे की, महसूल विभागाच्या या उपक्रमांचा लाभ जलदगतीने व सुलभतेने नागरिकांना मिळावा यासाठी सर्व संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी जबाबदारीने कार्य करावे. नागरिकांनीही या सेवांचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande