छ. संभाजीनगरमध्ये राबविण्यात आली वोट चोर, गद्दी छोड स्वाक्षरी मोहीम
छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। भाजप सरकारच्या नरेंद्र–देवेंद्र यांनी देशासोबत केलेल्या मतचोरीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री.हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार शहर जिल्हा काँग्रे
Q


छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। भाजप सरकारच्या नरेंद्र–देवेंद्र यांनी देशासोबत केलेल्या मतचोरीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री.हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने वोट चोर, गद्दी छोड स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

ही मोहीम शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन परिसरात पार पडली.

याप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या उपक्रमाद्वारे मोदी–फडणवीस सरकारच्या जनविरोधी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तसेच लोकशाहीच्या संरक्षणासाठी जनतेचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन करण्यात आले.

.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande