फिडे ग्रँड स्विस: भारतीय ग्रँडमास्टर वैशाली कॅंडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र
ताश्कंद, 16 सप्टेंबर (हिं.स.) भारतीय महिला ग्रँडमास्टर आर. वैशालीने शानदार कामगिरी करत कॅंडिडेट्स स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. वैशालीने फिडे ग्रँड स्विसच्या ११ व्या आणि अंतिम फेरीत माजी विश्वविजेत्या चीनच्या झोंगी टॅनसोबत बरोबरी साधली. रशियाची कॅट
भारतीय ग्रँडमास्टर आर  वैशाली


ताश्कंद, 16 सप्टेंबर (हिं.स.) भारतीय महिला ग्रँडमास्टर आर. वैशालीने शानदार कामगिरी करत कॅंडिडेट्स स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. वैशालीने फिडे ग्रँड स्विसच्या ११ व्या आणि अंतिम फेरीत माजी विश्वविजेत्या चीनच्या झोंगी टॅनसोबत बरोबरी साधली. रशियाची कॅटेरिना लॅग्नो अझरबैजानच्या उल्विया फतालियाएवासोबत बरोबरी साधून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आणि संभाव्य ११ पैकी आठ गुण मिळवून वैशालीव्यतिरिक्त कॅंडिडेट्ससाठी पात्र ठरणारी दुसरी बुद्धीबळपटू ठरली. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इतर कोणत्याही भारतीयांना कॅंडिडेट्समध्ये स्थान मिळवता आले नाही.

नेदरलँड्सचा अनिश गिरी अमेरिकेच्या हान्स मोके निमनला पराभूत करून ओपन प्रकारात विजेता ठरला. अनिशने देखील संभाव्य ११ पैकी आठ गुण मिळवून स्पर्धा संपवली. मॅथियास ब्लूबॉम दुसऱ्या स्थानावर राहून कॅंडिडेट्समध्ये स्थान मिळवण्याची शक्यता आहे. अनिश गिरी आणि मॅथियास ब्लूबॉम या स्पर्धेतून, अमेरिकेचा हिकारू नाकामुरा रेटिंगनुसार, आर प्रज्ञानंदजा आपल्या टूर्नामेंट सर्किट कामगिरीच्या आधारे आणि अमेरिकेचा फॅबियानो कारुआना हे कॅन्डिडेटमध्ये स्थान मिळवतील. पुढील महिन्यात गोव्यात होणाऱ्या वर्ल्ड चेस कपमधून अंतिम तीन जागा भरल्या जातील. कॅन्डिडेटचा विजेता सध्याचा वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशला आव्हान देईल.

पुरुषांच्या गटात भारतीयांसाठी फक्त एकच स्थान निश्चित दिसते. तर महिलांच्या गटात तीन बुद्धीबळपटूंनी कॅन्डिडेटमध्ये स्थान मिळवले आहे. दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी गेल्या महिला विश्वचषकात अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवून आधीच पात्र ठरल्या आहेत. वैशाली आता त्यांच्यात सामील झाल्यामुळे तिन्ही भारतीय महिला कॅन्डिडेट स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतील. ज्यामुळे त्यांना वर्ल्ड वुमन चेस विजेतेपद जिंकण्याची संधी मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande