स्मृती मानधना आयसीसी क्रमवारीत पुन्हा अव्वल क्रमांकावर विराजमान
दुबई, 16 सप्टेंबर, (हिं.स.) - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ताज्या क्रमवारीची घोषणा केली आहे. भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने आयसीसी महिला फलंदाजी क्रमवारीत कमाल केली आहे. स्मृती मानधनाने पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर झेप घेत अव्वल स्थान मिळवले आहे
स्मृती मानधना


दुबई, 16 सप्टेंबर, (हिं.स.) - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ताज्या क्रमवारीची घोषणा केली आहे. भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने आयसीसी महिला फलंदाजी क्रमवारीत कमाल केली आहे. स्मृती मानधनाने पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर झेप घेत अव्वल स्थान मिळवले आहे. विश्वचषक सुरू होण्याच्या फक्त दोन आठवड्यांपूर्वी मानधनाने इंग्लंडची कर्णधार नॅट सिव्हर-ब्रंटला मागे टाकत नंबर-१ वनडे फलंदाज बनली आहे.

स्मृती मानधनाला आयसीसी क्रमवारीत चंदीगडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात ५८ धावांच्या तिच्या दमदार खेळीचा फायदा झाला. या खेळीमुळे तिला ७ रेटिंग गुण मिळाले आणि ती इंग्लंडच्या कर्णधारापेक्षा चार गुणांनी पुढे गेली. तिचे आता ७३५ रेटिंग गुण आहेत. मानधनाने जून-जुलै २०२५ मध्येही नंबर-१ स्थान पटकावले होते. यापूर्वी २०१९ मध्येही ती नंबर-१ महिला एकदिवसीय फलंदाज होती.

मानधना व्यतिरिक्त भारताची प्रतीका रावल चार स्थानांनी वर चढली असून ४२ व्या स्थानावर पोहोचली आहे. तर हरलीन देओल पाच स्थानांनी पुढे सरकली आहे आणि ४३ व्या स्थानावर पोहोचली आहे. टॉप-१० एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत मानधना ही एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आठ विकेट्सने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळाडूंच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. बेथ मूनी तीन स्थानांनी पुढे सरकून पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. अ‍ॅनाबेल सदरलँड आणि फोबी लिचफिल्ड यांनी अर्धशतके झळकावत संयुक्तपणे २५ व्या स्थानावर पोहोचली आहे.

एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनाही फायदा झाला आहे. वेगवान गोलंदाज किम गार्थ एका स्थानाने पुढे सरकून चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. फिरकी गोलंदाज अलाना किंग पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. भारताची ऑफ-स्पिनर स्नेह राणा देखील पाच स्थानांनी पुढे सरकून १३ व्या स्थानावर पोहोचली आहे. इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन अजूनही नंबर-१ गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियनची अ‍ॅश गार्डनर अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. अ‍ॅनाबेल सदरलँड सहाव्या आणि एलिस पेरी १३ व्या स्थानावर पोहोचली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande