मुंबई, 16 सप्टेंबर, (हिं.स.) १० सप्टेंबर रोजी ‘जॉली एलएलबी 3’ चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आणि चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. ट्रेलरमधील हशा, ड्रामा आणि भव्य कोर्टरूम फेस-ऑफच्या झलकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. प्रत्येक फ्रेममध्ये कोर्टातील वाद, तिखट-टिप्पणी आणि कॉमिक टायमिंगचे भन्नाट मिश्रण स्पष्ट दिसून आले, ज्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटातील अंतिम क्लॅशची उत्सुकता लागली आहे.
या वेळी फ्रँचायझीतील दोन लोकप्रिय अभिनेत्री – हुमा कुरैशी आणि अमृता राव – पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. हुमा कुरैशी आपला जुना पुष्पा पांडेचा खट्याळ अंदाज आणि दमदार संवादांसह परत येत आहे, तर अमृता राव संध्या त्यागीच्या ग्रेसफुल आणि सपोर्टिव्ह भूमिकेत पुनरागमन करीत असून, तिच्या उपस्थितीमुळे आधीच्या भागांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.
हुमा–अमृता आणि अक्षय कुमार–अरशद वारसी यांच्या जोड्या मिळून कोर्टरूम ड्रामा आणि कॉमिक टायमिंगला नव्या उंचीवर नेणार आहेत. याशिवाय सौरभ शुक्ला आणि गजराज राव यांसारखे अनुभवी कलाकार व्यंग आणि विनोदाची जोड देऊन चित्रपट अधिक प्रभावी करणार आहेत.
ट्रेलरवरून हे स्पष्ट होते की या वेळेस कोर्टरूम क्लॅश आणि कॉमिक सीन्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि मनोरंजक असणार आहे. स्टार स्टुडिओ 18च्या बॅनरखाली आणि सुभाष कपूर यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांसाठी अफलातून धमाका घेऊन येत आहे.
प्रेक्षकांची उत्सुकता आता केवळ १९ सप्टेंबरपर्यंतच आहे, जेव्हा ‘जॉली एलएलबी 3’ सिनेमागृहात प्रदर्शित होऊन अंतिम कोर्टरूम क्लॅशचा थरार अनुभवायला मिळेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर