मुंबई, 16 सप्टेंबर (हिं.स.)।
बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जाह्नवी कपूर पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक रोमँटिक कॉमेडी देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
शशांक खेतान दिग्दर्शित या चित्रपटात वरुण सनी संस्कारी तर जाह्नवी तुलसी कुमारीच्या भूमिकेत झळकणार आहेत. दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.
याशिवाय सान्या मल्होत्रा (अनन्या), रोहित सराफ (विक्रम) यांच्या ताज्या जोडीने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. करण जोहर निर्मित हा सिनेमा २ ऑक्टोबरला प्रदर्शित होत असून त्यात मनीष पॉल, अक्षय ओबेरॉय आणि रिया विज यांसारख्या कलाकारांचाही समावेश आहे.
प्रेम, हशा आणि मजेशीर वळणांनी भरलेली ही कथा नक्कीच थिएटरमध्ये धुमाकूळ घालणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर