छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त येत्या बुधवारी (दि.१७) ध्वजारोहण, व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील हिरवळीवर मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते सकाळी ८ः३० वाजता ध्वजारोहण करण्यात येईल. तर यांनतर महात्मा फुले सभागृहात लगेच मुख्य कार्यक्रम होईल. यावेळी नागपूरचे जिल्हा माहिती अधिकारी, अभ्यासक विनोद रापतवार यांचे ’स्मरण हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचे’ या विषयावर व्याख्यान होईल. कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहणार आहेत. कार्यक्रमास प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विनोद रापतवार हे मराठवाडयाचा इतिहासाचे अभ्यासक असून पीपीटी व ध्वनी चित्रफितीच्या द्वारे हा विषय मांडणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis