मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न
अमरावती, 16 सप्टेंबर (हिं.स.) ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस त्यांचे कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता तालुका ते राज्य असे चार स्तरांवर प्रोत्साहन देण्याकरिता या स्प
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न.


अमरावती, 16 सप्टेंबर (हिं.स.) ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस त्यांचे कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता तालुका ते राज्य असे चार स्तरांवर प्रोत्साहन देण्याकरिता या स्पर्धेत उत्कृष्ट काम करून सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करण्याचे अभिवचन देण्यासाठी आणि आनुषंगिक क्षमता बांधणीच्या उद्देशाने तहसील कार्यालय तिवसाच्या सभागृहात दिनांक १५ सप्टेंबर रोजी रोजी तालुकास्तरीय कार्यशाळा पार पडली. सदर अभियानाचा कालावधी दिनांक १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ आहे. अभियानाचे मुख्य सात घटक असून शंभर टक्के गुण प्राप्तीसाठी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने सकारात्मकरित्या सहभाग नोंदविण्याचे आवाहन श्री अभिषेक कासोदे, गटविकास अधिकारी यांनी त्यांचे प्रास्ताविकातून केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी श्री राजेशभाऊ वानखडे, आमदार, तिवसा हे आभासी पद्धतीने होते. प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती छायाताई दंडाळे, प्रदीपभाऊ गौरखेडे, डॉ. मयूर कळसे, तहसीलदार, श्री नारायण अमझरे , सहा. गटविकास अधिकारी तसेच डॉ. नितीन उंडे, गटशिक्षणाधिकारी हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यशाळेला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख विस्तार अधिकारी आणि पंचायत समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये श्री. राहुल कांबळे, विस्तार अधिकारी आणि दुसऱ्या सत्रामध्ये श्री पांडुरंग उलेमाले, विस्तार अधिकारी यांनी तपशीलवार मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे संचालन श्री अजय अडीकने आणि श्री अतुल देशमुख यांनी केले. आभार प्रदर्शन श्री नारायण अमझरे, सहा. गटविकास अधिकारी यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीततेसाठी पंचायत समिती तिवसा येथील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande