नाफेड–एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा होतोय खराब...
शासकीय गोडाऊनमधील चाळी फोडल्यावर उघड झालं वास्तव सहकारी संस्था चालकांच्या अडचणी वाढल्या लासलगाव, 16 सप्टेंबर (हिं.स.)। नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत तब्बल तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती.मात्र,या बफर स्टॉ
नाफेड–एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा होतोय खराब...


शासकीय गोडाऊनमधील चाळी फोडल्यावर उघड झालं वास्तव सहकारी संस्था चालकांच्या अडचणी वाढल्या लासलगाव, 16 सप्टेंबर (हिं.स.)। नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत तब्बल तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती.मात्र,या बफर स्टॉकमधील कांद्याचा साठा आता मोठ्या प्रमाणावर खराब होऊ लागल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. कलकत्ता,गुवाहाटी आणि चेन्नई येथे कांदा पाठवण्यासाठी शासकीय गोडाऊनमधील चाळी फोडण्यात आल्यावर ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. नाफेड,एनसीसीएफच्या कांद्याच्या साठ्याची प्रतवारी दरम्यान तब्बल २० ते २५ टक्के कांदा खराब झाल्याचे स्पष्ट झाले आहे.उर्वरित चाळी फोडल्यावर अजून किती कांदा निकृष्ट निघेल याबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे खरेदी केलेला हा बफर स्टॉक प्रत्यक्षात किती उपयुक्त ठरेल याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कांदा खरेदीदार सहकारी संस्थांची वाढली डोकेदुखी केंद्र सरकारच्या वतीने खरेदी केलेल्या या कांद्याच्या देखरेख व साठवणुकीची जबाबदारी खरेदीदार सहकारी संस्था व मंडळांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, कांद्याचा साठा खराब होऊ लागल्याने फक्त ६५ टक्के रिकव्हरी कशी साधायची हा मोठा प्रश्न संस्था चालक व संचालक मंडळांसमोर उभा राहिला आहे. खराब झालेल्या कांद्याची विल्हेवाट लावणे, इतर बाबींमुळे या संस्थांच्या आर्थिक घडामोडी आणखी गुंतागुंतीच्या होऊ लागल्या आहेत.

कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात.,.... खरेदी केलेल्या तीन लाख मेट्रिक टन कांद्यापैकी काही कांदा कलकत्ता गुवाहाटी चेन्नई यासारख्या शहरांमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे मात्र दोन ते अडीच महिने उलटून गेल्यानंतरही नाफेड एनसीसीएफ ला दिलेल्या कांद्याचे पैसे मिळालेले नाही दुसरीकडे हा कांदा बाजारात आल्यामुळे कांद्याचे बाजार भाव घसरल्याने शिल्लक असलेल्या कांद्याचा उत्पादन खर्चही निघनेही मुश्किल झाला आहे या दुहेरी संकटामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे दसरा दिवाळी या सणासाठी घरामध्ये पैशाची अत्यंत गरज असताना आता काय करावा असा प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे ---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande