बीजिंग, 16 सप्टेंबर, (हिं.स.) - पीव्ही सिंधूने चायना मास्टर्स सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये डेन्मार्कच्या ज्युली दावल जेकबसनला पहिल्या फेरीत सरळ गेममध्ये पराभूत करत प्रवेश केला आहे. दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती सिंधूने जेकबसनला फक्त २७ मिनिटांत २१-४, २१-१० असे पराभूत केले. हाँगकाँग ओपन सुपर ५०० स्पर्धेच्या पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या लाइन क्रिस्टोफरसनविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर १० दिवसांपेक्षा कमी वेळात भारतीय बॅडमिंंटनपटू हा विजय मिळाला.
या वर्षी हाँगकाँग ओपनसह सहा बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर स्पर्धांच्या पहिल्या फेरीत पराभूत झालेली सिंधू चांगल्या लयीत दिसत होती. ३० वर्षीय बॅडमिंंटनपटूने काही वेळातच चांगली आघाडी घेतली आणि १० मिनिटांपेक्षा थोड्या जास्त वेळात पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येही हाच ट्रेंड कायम राहिला. गेल्या दोन सामन्यांमध्ये डॅनिश बॅडमिंटनपटूला पराभूत करणाऱ्या सिंधूने ४-१ अशी आघाडी घेतली होती पण जेकबसनने ४-४ अशी आघाडी घेतली.
यानंतर सिंधूने तिचा अनुभव आणि उत्कृष्ट तंत्र दाखवत तिच्या प्रतिस्पर्ध्याचे आव्हान मोडून काढले. सिंधूने सलग सहा गुण मिळवत ११-८ ते १७-८ अशी आघाडी घेतली आणि नंतर सहज गेम जिंकला. मार्चमध्ये योनेक्स स्विस ओपनच्या पहिल्या फेरीत या दोन्ही बॅडमिंटनपटूंमध्ये शेवटचा सामना झाला होता. तेव्हा पराभव होऊनही जेकबसनने सिंधूला जोरदार टक्कर दिली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे