रत्नागिरी : राजापूर कुणबी पतपेढीचा १२ टक्के लाभांश जाहीर
रत्नागिरी, 16 सप्टेंबर, (हिं. स.) | राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीने वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यात आला. पतसंस्थेचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा महत्त्वपूर्ण ठरावही सभेत मंजूर करण्यात आला. एकतीस वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर
रत्नागिरी : राजापूर कुणबी पतपेढीचा १२ टक्के लाभांश जाहीर


रत्नागिरी, 16 सप्टेंबर, (हिं. स.) | राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीने वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यात आला. पतसंस्थेचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा महत्त्वपूर्ण ठरावही सभेत मंजूर करण्यात आला. एकतीस वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर, कार्यविस्तार करण्याच्या उद्देशाने पतसंस्थेचे रत्नागिरी जिल्हा असलेले कार्यक्षेत्र वाढवून ते कोकण विभागात वाढविण्याचा महत्त्वपूर्ण ठराव राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

पतसंस्थेच्या यशस्वी घौडदौडीबद्दल संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक करण्यात आले. राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहामध्ये चेअरमन प्रकाश मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला व्हाइस चेअरमन प्रकाश लोळगे यांच्यासह सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, वसुली अधिकारी श्रीकांत राघव यांच्यासह कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेत वार्षिक अहवाल, नफा-तोटा पत्रक, ताळेबंद, वैधानिक लेखापरीक्षण अहवालावर चर्चा करून मंजूरी देण्यात आली. नफा विभागणीस मान्यता देत वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत रवींद्र नागरेकर, शंकर चोरगे, रामचंद्र सरवणकर आदींनी भाग घेतला. पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचार्‍यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांचे वेतन वाढविण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर चर्चा करताना सभासदांच्या मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार करून कर्मचार्‍यांना व पिग्मी एजंट यांना योग्य न्याय दिला जाईल अशी ग्वाही चेअरमन मांडवकर यांनी दिली.

गाव तेथे शाखा सुरू करणे शक्य नसल्याने काही महत्त्वाच्या ठिकाणी मध्यवर्ती भागात पतसंस्थेच्या सेवा उपलब्ध होण्याचे दृष्टीने अत्याधुनिक ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट करण्यात आला. राजापूर शहरात सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी संस्थेची नवी वास्तू उभी करणे, नवीन शाखा निर्मितींबरोबरच 100 कोटी ठेवींचे उद्दिष्ट राखताना एकूण व्यवसाय 150 कोटींवर नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande