अकोला येथील शिवार फेरीत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
गडचिरोली., 16 सप्टेंबर (हिं.स.)डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला तर्फे विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधून दिनांक २० ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत विद्यापीठात शिवार फेरी व थेट पिक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद
अकोला येथील शिवार फेरीत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन


गडचिरोली., 16 सप्टेंबर (हिं.स.)डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला तर्फे विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधून दिनांक २० ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत विद्यापीठात शिवार फेरी व थेट पिक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकोला येथे २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

या शिवार फेरीचे मुख्य उद्दिष्ट शेतकरी, संशोधक, धोरणकर्ते व उद्योग भागधारक यांना एकत्र आणून अत्याधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती देणे, शाश्वत व पर्यावरणास अनुकूल शेती पद्धतीबाबत मार्गदर्शन करणे तसेच पिक उत्पादकता वाढीसाठी प्रभावी उपाययोजना प्रत्यक्ष शिवार प्रात्यक्षिकातून दाखविणे हे आहे.

कार्यक्रमात तृणधान्य, कडधान्य, सोयाबीन, भाजीपाला, फुलपिके, फळपिके, चारा पिके व धान या विविध पिकांवरील प्रगत तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार असून शेतकऱ्यांना आपल्या शेतात ते अंमलात आणता येईल.

या तीन दिवसीय शिवार फेरीदरम्यान कृषि क्षेत्रातील आव्हाने व संधी यावर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन केले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या शिवार फेरी व पिक प्रात्यक्षिकास मोठ्या संख्येने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्मा प्रकल्प संचालक तथा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande