छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून पक्षातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या 'सेवा पंधरवडा २०२५' निमित्त सिल्लोड भाजपा कार्यालय येथे भवन मंडळात कार्यशाळा संपन्न झाली.
सेवा संदर्भात निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या सिल्लोड तालुक्यातील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला
सरकार हे सेवेचे माध्यम आहे, हे अटलजींचे वाक्य मोदीजींनी सत्यात उतरवत, सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी गेली ११ वर्ष ते अविरत कार्य करत आहेत. या कार्यातून प्रेरित होत समाजाच्या हितासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी भाजपा अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रिसजी मुलतानी , जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर, भाजपा नेते कैलास जंजाळ,भवन मंडळाध्यक्ष एकनाथ हिवाळे , अशोक साखळे, राहुल राठोड, अंबादास सपकाळ, सोमिनाथ कळम पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis