नांदेड - 49 वी राज्यस्तरीय टेनिक्वाईट महिला आणि पुरुष अजिंक्यपद स्पर्धा संपन्न
नांदेड, 16 सप्टेंबर (हिं.स.)। 49 वी राज्यस्तरीय टेनिक्वाईट महिला आणि पुरुष अजिंक्यपद स्पर्धा नांदेड येथे संपन्न झाली. पुरुष सांघिक स्पर्धेत पुणे शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे. महिला संगीत स्पर्धेत भंडारा जिल्ह्याने आपले वर्चस्व राखले आहे. श्
अ


नांदेड, 16 सप्टेंबर (हिं.स.)। 49 वी राज्यस्तरीय टेनिक्वाईट महिला आणि पुरुष अजिंक्यपद स्पर्धा नांदेड येथे संपन्न झाली.

पुरुष सांघिक स्पर्धेत पुणे शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे. महिला संगीत स्पर्धेत भंडारा जिल्ह्याने आपले वर्चस्व राखले आहे.

श्री गुरु गोविंदसिंगजी स्टेडियमवर झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांतील 44 पुरुष-महिला संघांनी सहभाग नोंदवून क्रीडाप्रेमींना राष्ट्रीय दर्जाचे रोमांचक सामने अनुभवायला मिळाले.

महत्त्वाचे निकाल

पुरुष सांघिक: पुणे शहर – प्रथम | भंडारा – द्वितीय

महिला सांघिक: भंडारा – प्रथम | पुणे शहर – द्वितीय

एकेरी पुरुष: साहिल खांडेकर (पुणे) – प्रथम

एकेरी महिला: झोया सय्यद (भंडारा) – प्रथम

दुहेरी पुरुष: शुभम पांडे – दीपक कांबळे (भंडारा) – प्रथम

दुहेरी महिला: लावण्या लांजेवार – अश्विनी बाडेबुचे (भंडारा) – प्रथम

या स्पर्धेला राज्यभरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. पंचांनी अचूक निर्णय देत उत्कृष्ट खिलाडूवृत्ती जपली.

खेळातील जिद्द आणि सातत्य हेच खऱ्या विजयाची खरी गुरुकिल्ली आहे! अशा शब्दात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी खेळाडूंचे कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande