नांदेड : तंत्रविभागातर्फे अभियंता दिनी टेक्नोव्हेशन 2025 संपन्न
नांदेड, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। “अभियंता हा फक्त मशीन बनविणारा नसून समाजाच्या गरजा ओळखून त्यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय शोधणारा व्यक्ती असतो.” असे प्रतिपादन श्री. अजय त्रिचूरकर, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी केले आहे. याच विचा
अ


नांदेड, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। “अभियंता हा फक्त मशीन बनविणारा नसून समाजाच्या गरजा ओळखून त्यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय शोधणारा व्यक्ती असतो.” असे प्रतिपादन श्री. अजय त्रिचूरकर, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी केले आहे. याच विचारांच्या प्रेरणेने श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज व्यवसाय विभागात ‘टेक्नोव्हेशन 2025’ या भव्य तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अजय त्रिचूरकर यांनी विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधला, तर प्रमुख पाहुणे डॉ. प्रियंका खोले यांनी शैक्षणिक महत्व स्पष्ट केले. विभाग प्रमुख साहेबराव भिसे यांनी प्रस्ताविकेत या प्रदर्शनामागचा उद्देश सांगितला.

प्रदर्शनात एकूण १५ प्रकल्प सादर करण्यात आले. त्यात क्रॉप प्रोटेक्शन मशीन, पोर्टेबल वेल्डिंग मशीन, अॅक्सिडेंट प्रिव्हेंटिव्ह सिस्टिम, ह्युमन फॉलोविंग रोबोट, आरती परफॉर्मिंग रोबोट, ऑटोमॅटिक टोल प्रोटेक्शन सिस्टिम, जार लिफ्टिंग मशीन, परसबाग यंत्र, चपाती मेकिंग मशीन, एलपीजी सिलेंडर लिफ्टिंग मशीन यांसह अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश होता.

या प्रदर्शनात बारावी व्यवसाय विभाग, अटल लॅबचे विद्यार्थी सहभागी झाले होते. संकुलातील ४८५ विद्यार्थ्यांनी भेट देऊन प्रकल्पांचा अनुभव घेतला.

अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य, सर्जनशीलता आणि उद्योजक वृत्तीला नवे बळ मिळते, असे उपस्थितांनी सांगितले. या प्रसंगी संस्थेतील विभागप्रमुख, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande