युवक महोत्सवाचे थाटात उद्घाटन; मानपत्र देऊन कुलगुरुंचा गौरव
छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलगुरू विजय फुलारी यांना माजी बिसीयुडी संचालक प्राचार्य डॉ भागवत कटारे यांच्या हस्ते मानपत्र देऊन ग
Q


Q


छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलगुरू विजय फुलारी यांना माजी बिसीयुडी संचालक प्राचार्य डॉ भागवत कटारे यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

या महाविद्यालयाचे प्रांगणात अंबड येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात यंदापासून जिल्हानिहाय युवक महोत्सव घेण्यात येत आहे. .कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माजी बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ .भागवतराव कटारे हे होते. तर सिने गीतकार डॉ विनायक पवार , व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ भारत खंदारे , संचालक डॉ.कैलास अंभुरे व प्राचार्य डॉ.मिलिंद पंडित

यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांची पष्टाब्दीपूर्ती झाली. यानिमित्त मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्यावतीने कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांचा माजी बीसीयुडी संचालक डॉ.भागवत कटारे यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरविण्यात आले. दीड वर्षांच्या कारकिर्दीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला ’नॅक ए प्लस’ मानांकन सह राष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक प्राप्त केल्याबद्दल गौरव करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande