पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर;  नेत्यांमध्ये चढाओढ
पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.)। पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून हे पद यंदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले आहे. त्यामुळे इच्छुकांसाठी एकप्रकारे खुले मैदान तयार झाले असून, पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर अनेक गणित ठरणार आहे
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर;  नेत्यांमध्ये चढाओढ


पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.)। पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून हे पद यंदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले आहे. त्यामुळे इच्छुकांसाठी एकप्रकारे खुले मैदान तयार झाले असून, पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर अनेक गणित ठरणार आहेत.तरी देखील अनेकांना आपण अध्यक्ष होऊ, अशी स्वप्ने पडू लागले आहेत. अनेकदा विशिष्ट प्रवर्गासाठी राखीव असलेले हे पद यावर्षी सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने स्थानिक नेत्यांमध्ये चढाओढ अपरिहार्य ठरणार आहे.

परिषदेचे अध्यक्षपद म्हणजे ग्रामीण भागातील विकास निधी वाटप, प्रशासकीय निर्णयांवर प्रभाव आणि आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुकांसाठीनेतृत्व तयार करणारी महत्त्वाची व्यासपीठ मानले जाते. त्यामुळे प्रशासक कालावधी काळानंतर अध्यक्ष होण्यासाठी अनेकांची इच्छा असली तरी देखील, जिल्हा परिषद गटांचे आरक्षण होणे अद्याप बाकी आहे. त्या आरक्षणानंतरच अध्यक्षपदाचे खरे चेहेरे समोर येतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande