पेण येथे अमृत मेळावा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न
रायगड, 17 सप्टेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अंतर्गत विविध योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील विविध तालुक्यांमध्ये मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील पेण येथ
पेण येथे अमृत मेळावा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न


रायगड, 17 सप्टेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अंतर्गत विविध योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील विविध तालुक्यांमध्ये मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील पेण येथे अमृत मेळावा कार्यक्रम १४ सप्टेंबर रोजी पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने सभागृहात यशस्वीपणे पार पडला, अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बापूसाहेब नेने होते. तसेच बँक ऑफ इंडिया, पेण शाखेचे व्यवस्थापक सौरभ पणशीकर आणि अमृत संस्थेचे कोकण विभागीय व्यवस्थापक अमित सामंत उपस्थित होते.

अमित सामंत यांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती उपस्थित नागरिकांना दिली आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी या योजनांचा नक्की लाभ घ्यावा, असे आवाहन केले. एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या विचाराला अनुसरून, लक्षित लाभार्थ्यांना योजनांची माहिती देऊन कागदपत्रांची पूर्तता करून संपूर्ण लाभ मिळवून देणे हे संस्थेचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

मेळाव्याचे निमंत्रक मंगेश नेने यांनी सभागृह व्यवस्थापन आणि अल्पोपहाराची उत्तम जबाबदारी पार पाडली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर व रायगड जिल्ह्याचे सहव्यवस्थापकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल शैलेश विनायक मराठे यांनी आभार व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande