भाजप, भागीरथी संस्थेच्या झिम्मा फुगडी स्पर्धेत बोरजाई महिला संघ अजिंक्य
कोल्हापूर, 17 सप्टेंबर, (हिं.स.)| भाजपा आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीने आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा मंगळवारी रात्री जल्लोषात पार पडला. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीमुळे महीलांच्या उत्साहाला उधाण आले होते. या स्पर्ध
भाजप, भागीरथी संस्थेच्या झिम्मा फुगडी  स्पर्धा


कोल्हापूर, 17 सप्टेंबर, (हिं.स.)| भाजपा आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीने आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा मंगळवारी रात्री जल्लोषात पार पडला. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीमुळे महीलांच्या उत्साहाला उधाण आले होते. या स्पर्धेत, पन्हाळा तालुक्यातील बोरगावच्या बोरजाई महिला संघाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. तर युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी केलेल्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.

धनंजय महाडीक युवाशक्ती प्रेरीत, भागीरथी महीला संस्था आणि भाजपच्या वतीने मंगळवारी खासदार महोत्सवातर्गत झिम्मा फुगडी स्पर्धा झाल्या. महासैनिक दरबार हॉलमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होती. दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा, सायंकाळी पार पडला. अभिनेत्री प्राजक्ता माळी, खासदार धनंजय महाडिक, अरुंधती महाडिक, भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, वैष्णवी महाडिक, अंजली महाडिक, स्पर्धेचे प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकरच्या रेवती पाटील, जिजाई मसाले कंपनीच्या वैशाली भोसले, काले बजाजचे विप्लव कासलीवाल, परीक्षक आनंद गिरी, संजय पाटील, श्रृती खांडेकर, राजश्री ढवळे, मानसी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत, विवीध गटातील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.

यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मंचावर झिम्मा खेळत, उपस्थित महिलांचा आनंद द्विगुणीत केला. अरुंधती महाडिक यांच्या कार्याबद्दल बोलण्यासाठी, तासनतास अपुरे पडतील, असे गौरवोदगार प्राजक्ता माळी यांनी काढले. तर कृष्णराज महाडिक यांचे व्हिडीओ ब्लॉग आणि सामाजिक बांधिलकी याबद्दलही त्यांनी प्रशंसा केली. कृष्णराज महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना, माझी आई हाच माझा गुरु आणि आदर्श असल्याचे सांगितले. आपल्या माता-पित्यांचा आर्शिवाद घेतले, की कोणत्याही कामात यश मिळणार, असे सांगून, लवकरच कोल्हापुरात महिलांसाठी स्वच्छतागृह उभी करण्याची मोहिम आखल्याचे सांगितले. तसेच भागीरथी संस्थेच्या सदस्यांना या माध्यमातून रोजगार दिला जाईल, असे कृष्णराज महाडिक म्हणाले. खासदार महाडिक यांनी महिलांनी दाखवलेला उत्साह आणि प्रतिसाद याबद्दल समाधान व्यक्त केले. १४ वर्षाच्या युवतींपासून ते ९३ वर्षाच्या आजीबाईंपर्यंतच्या महिला या उपक्रमामध्ये सहभागी आहेत. ही स्पर्धा म्हणजे अरुंधती महाडिक यांच्या महिला सक्षमीकरण मोहिमेला मिळालेले यश आहे, असेही खासदार महाडिक म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणीचा महिलांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande