नमो सेवा वर्ष आदर्श पद्धतीने साजरे करा - उदय सामंत
रत्नागिरी, 17 सप्टेंबर, (हिं. स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्षभर ''नमो सेवा वर्ष'' साजरे करून महसूल विभागाने राज्यासमोर वेगळा आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. जिल्हा नि
नमो सेवा सप्ताहाचा प्रारंभ


रत्नागिरी, 17 सप्टेंबर, (हिं. स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्षभर 'नमो सेवा वर्ष' साजरे करून महसूल विभागाने राज्यासमोर वेगळा आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.

जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते महसूल विभाग सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने सेवादूत ही सेवा घरपोच देण्याचा उपक्रम, ई-तक्रार निवारण प्रणाली आणि ई–संदर्भ पोर्टल या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा कळ दाबून पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ते म्हणाले, महसूल हे महच्त्वाचे खाते आहे. महाराष्ट्राच्या महसूल विभागांना हा सेवा पंधरवड्याचा उपक्रम आहे. परंतु, आपण हे वर्ष नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नमो सेवा वर्ष म्हणून साजरा करावे. जिल्ह्यातील नागरिकाला, ग्रामस्थाला पंधरा दिवस सुखी ठेवण्यापेक्षा वर्षाचे 365 दिवस आपण त्याला सुखी ठेवले, तर खऱ्या अर्थाने आपण शासनाला अपेक्षित असलेले काम करत आहोत, अशा पद्धतीचे चित्र एक वेगळा आदर्श म्हणून राज्यात जाईल. कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचे स्वागत हसत करावे. माझ्याबरोबर हसून बोलले, मला त्यांनी सन्मान दिला, मला त्यांनी आदर दिला, असा संदेश जनतेत गेला पाहिजे.

सन्मानाची वागणूक मिळाली नाही, तर तक्रारीची उत्पत्ती होते. जिल्ह्यातला अधिकारी किंवा महसूल अधिकारी भविष्यात कधीच नागरिकांची प्रतारणा होणार नाही, यासाठी काळजी घेईल. त्याला सन्मानाची वागणूक देईल. अधिकाऱ्यांनी माझे ऐकून घेतले ही भावना नागरिकांसाठी महत्त्वाची आहे. नागरिकांचे ऐकून घेतले नाही, तर त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होतो. प्रशासनाचे सगळे लोक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रशासनाचा एक वेगळा दर्जा हा महाराष्ट्रामध्ये टिकलेला आहे.

खरे आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका असते. पुढच्या वर्षभरामध्ये जो योग्य आहे, ज्याने चांगले काम केले आहे, त्याला शाबासकी देऊ आणि ज्यांना वाईट काम केले आहे, त्याच्यावर कारवाई करू.

प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी प्रास्ताविक केले. शिधापत्रिका, वय, अधिवास दाखला, रहिवास दाखला, जातीचा दाखला यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande