स्थानिक नागरिकांना श्वसन आणि उलटीचा त्रास
चंद्रपूर, 17 सप्टेंबर (हिं.स.)। चंद्रपूरच्या रहमत नगर येथे सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटमधून क्लोरीन गॅस लिकेज झाल्याची घटना सायंकाळी समोर आली. त्यामुळे नागरिकांना उलटीचा आणि श्वसनाचा त्रास झाला
रहमत नगर येथे चंद्रपूर महापालिकेचा सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट आहे. सदर प्लांटमधून क्लोरीन गॅस लिकेज झाल्याची घटना आज (बुधवार) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. गॅस गळतीमुळे परिसरातील अनेक नागरिकांना उलटी व श्वसनाचा त्रास सुरू झाला.
याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकार्यांसह घटनास्थळी भेट दिली. यावेळी तातडीने गळती बंद करण्यात आली असून जवळपासच्या नागरिकांना किडवई हायस्कूल येथे हलविण्यात आले आहे.सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव