पालघर, 17 सप्टेंबर (हिं.स.) : पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड स्थानकात मुंबईहून वलसाडकडे जाणाऱ्या वलसाड फास्ट पॅसेंजर गाडीच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली आहे. रात्री सुमारे ७.४५ वाजता गाडी फलाटावर उभी असताना हा प्रकार घडला. आग विझविण्यासाठी पालघर नगरपरिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रवाशांना खबरदारीचा इशारा देण्यात आला असून आग पूर्णपणे विझेपर्यंत इतर गाड्या पुढे सोडण्यात येणार नाहीत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.तर या घटनेमुळे डहाणू दरम्यानच्या विविध स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवासीवर्गासाठीजिल्हा प्रशासनाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL