छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.)। मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरिय शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि ग्रामविकास मंत्री ना.श्री.जयकुमार गोरे यांच्या विशेष उपस्थितीत झाला.
या अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला विकासासाठी लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. आर्थिक समृद्धी, सुशासन, लोकसहभाग, सकारात्मक स्पर्धा आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवणे यावर या अभियानाचा मुख्य भर आहे. फुलंब्री तालुक्यातील किनगाव हे आदर्शगाव ठरले असून या ठिकाणाहून महाराष्ट्रात नवे परिवर्तन घडवण्यासाठी या अभियानाची सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील गावांना नवी गती देण्यासाठी, ग्रामपंचायतींना आर्थिक समृद्धी आणण्यासाठी, सुशासन प्रस्थापित करण्यासाठी आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
यावेळी पालकमंत्री .संजय शिरसाठ, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, खासदार श्री.संदिपान भुमरे, खासदार श्री.कल्याण काळे, आमदार श्री.संजय केणेकर, आमदार श्री.प्रशांत बंब, आमदार संजनाताई जाधव, छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री.अतुल चव्हाण व मान्यवरांची उपस्थिती होती..
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis