परभणी, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
पाथरी विधानसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार राजेश विटेकर यांनी केली. पाथरी तालुक्यातील मौजे लोणी, कानसुर, उमरा, गुंज, गौंडगाव, गावांना आमदार राजेश विटेकर यांनी भेटी दिल्या. मतदार संघातील अनेक गावात मागील दोन - चार दिवसापासून अतिवृष्टी झाल्यामुळे सगळ्या भागातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रामुख्याने जमिनीतील पिके अजूनही पाण्याखाली आहेत. तसेच नदीसह लहान मोठे ओढे तुडुंब भरून वाहात आहेत.
बळीराजा अतिशय चिंतेत आहे. त्यामुळे आ राजेश विटेकर यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी सोबत घेवून या गावांचा दौरा करून नुकसानीची पाहाणी केली. तसेच नुकसानग्रस्त जमिनींचे पंचनामे तात्काळ करण्याची सूचना महसूल विभागास केल्या आहेत.
यावेळी तहसीलदार हंडेश्वर तहसीलदार जि.प. माजी सभापती दादासाहेब टेंगेसे, बाळासाहेब कोल्हे, संजय काका रनेर यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, इतर प्रशासकीय अधिकारी, गावचे सरपंच, शेतकरी, महायुतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis