नांदेड : पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पत्रकार आणि साहित्यिकांचा पुढाकार
नांदेड, 17 सप्टेंबर (हिं.स.)। मुखेड तालुक्यातील रावणगाव येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पत्रकार आणि साहित्यिकांनी पुढाकार घेत मोठा आधार दिला आहे. पुरात विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य आणि स्कूल ड्रेसही वाहून गेले होते. अशा परिस्थितीत विद्यार
नांदेड : पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पत्रकार आणि साहित्यिकांचा पुढाकार


नांदेड, 17 सप्टेंबर (हिं.स.)। मुखेड तालुक्यातील रावणगाव येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पत्रकार आणि साहित्यिकांनी पुढाकार घेत मोठा आधार दिला आहे. पुरात विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य आणि स्कूल ड्रेसही वाहून गेले होते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना पुन्हा स्कूल ड्रेस मध्ये शाळेत जाता यावी यासाठी पत्रकार आणि साहित्यिकांनी संकलित केलेल्या निधीतून स्कूल ड्रेस , शूज , सॉक्स वाटप करण्यात आले. पत्रकार आणि साहित्यिकांनी या कामातून माणूसकीचा धर्म पाळण्याचे दिसून आले आहे.

मुखेड तालुक्यातील रावणगाव येथे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला होता. लेंडी धरणाच्या बॅक वॉटरचा फटका या गावालाही बसला. गावात पाणी शिरल्याने अक्षरशः जनजीवन उध्वस्त झाले होते. खाण्यापिण्याचे दैनंदिन जीवनाला आवश्यक असणारे साहित्यही वाहून गेले होते तर शालेय विद्यार्थ्यांचे कपडे , पुस्तकांची मोठी नासधूस झाली होती. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वह्या पुस्तकही नव्हती आणि स्कूल ड्रेसही नव्हता.

अशा परिस्थितीत पत्रकार योगेश लाटकर , पुणे येथील पत्रकार प्रसाद खेकाळे , अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य देविदास फुलारी मसप नांदेड शाखेचे अध्यक्ष बालाजी इबितदार, कार्यवाह प्रा महेश मोरे आदींनी पुढाकार घेऊन रावणगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल ड्रेस मिळावा यासाठी निधी संकलित केला . यावेळी साहित्यिकांनीही आपला खारीचा वाटा उचलला. त्यामुळे रावणगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला स्कूल ड्रेस , शूज , सॉक्स चे वाटप करण्यात आले.

यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता. विशेष बाबी की हे साहित्य वाटत करण्यासाठी पत्रकार अथवा साहित्यिक कोणीही त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. रावणगावचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच , मुखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजीव पाटील रावणगावकर यांच्यासह पोलीस पाटील रामेश्वर नुच्चे , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय येरेवाड यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande