नवी दिल्ली, 17 सप्टेंबर (हिं.स.)भारताचे माजी डावखुरा वेगवान गोलंदाज रुद्र प्रताप सिंग आणि डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा यांचा वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीत समावेश होण्याची शक्यता आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या पॅनेलमधून एस. शरथ आणि सुब्रतो बॅनर्जी बाहेर पडल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे. क्रिकेट सल्लागार समिती बोर्डाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी दोन्ही नावांना मान्यता देईल अशी अपेक्षा आहे. या बदलामुळे संघ व्यवस्थापन आणि वरिष्ठ निवड रचनेत एक नवीन अध्याय सुरू होईल. जो वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम केला जाईल. एस. शरथ यांची ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती होण्याचीही अपेक्षा आहे. बीसीसीआयने गेल्या महिन्यात दोन्ही राष्ट्रीय निवड पदांसाठी अर्ज मागवले होते. निवड समितीत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रमुख नावांनी रस दाखवला नाही.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या पदासाठी अर्ज केला होता. उत्तर प्रदेशचे माजी वेगवान गोलंदाज आशिष विन्स्टन झैदी आणि हिमाचल प्रदेशचे शक्ती सिंग हे मध्य विभागातून इतर उमेदवार होते. आरपी सिंग हा २००७ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या भारताच्या संघाचा सदस्य होता. त्याने ८२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि १२४ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये १४ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि १० टी-२० सामने समाविष्ट आहेत. तो २०१६-१७ मध्ये पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या रणजी करंडक विजेत्या संघाचाही भाग होता. प्रज्ञान ओझाची दक्षिण विभागाकडून निवड समिती सदस्य म्हणून नियुक्ती होत आहे. ओझाने त्याच्या कारकिर्दीत १४४ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या. त्यापैकी ११३ कसोटी क्रिकेटमध्ये घेतल्या आहेत. त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना हा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा शेवटचा कसोटी सामना होता. ज्यामध्ये ओझाने १० विकेट्स घेतल्या. ओझाने हैदराबादसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि बंगाल आणि बिहारसाठीही खेळला. तो एस शरथची जागा घेईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे