लातूर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, उदगीर शहराच्या वतीने सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज उदगीर शहरातील बसस्थानक परिसरात स्वच्छता व साफसफाई अभियान हाती घेण्यात आले.
या उपक्रमावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल भैया केंद्रे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके, शिवानंद हैबतपुरे महाराज, मनोहरजी भडेमामा, प्रकाशजी यरमे, तालुकाध्यक्ष रामदास बेबडे, शहराध्यक्ष अमोल अणकल्ले आदींसह भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्वच्छता मोहिमेद्वारे शहरवासीयांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचा संदेश देण्यात आला. सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत पुढील काही दिवसांमध्ये रक्तदान, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, जनजागृती उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis