पालघर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत चहाडे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अभियानाचा राज्यस्तरीय शुभांरभ निमित्त नुकताच ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) राजन पाटील , पालघर प.स.चे सहाय्यक गविअ बापुराव नाळे, सरपंच विष्णू जाधव, ग्रामपंचाय़त अधिकारी , तसेच विविध अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. तेथे स्वच्छता ही सेवा 2025 अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी आपले गाव स्वच्छ असेल तर आपले जिवन आरोग्यमय होते. तसेच आपल्या गावाची ओळख स्वच्छ गाव अशी निर्माण होते असे यावेळी बोईसर विधान सभेचे आमदार यानी सांगितले.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यास अनुसरुन दरवर्षी प्रमाणे स्वच्छता ही सेवा यासाठी स्वच्छोत्सव ” ही थीम निश्चित केली आहे. दि. 17 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर या कालावधीत ग्रामपंचायतींनी प्रभावी पणे राबवावी.
ग्रामीण भागात स्वच्छता राखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता हि सेवा 2025 अंतर्गत उपक्रम राबविण्याकरीता सार्वजनिक उत्सव मंडळे, महाविद्यालय, शाळा एनएसएस विद्यार्थी एनसीसीचे विद्यार्थी, सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, स्वच्छता कार्यात सेवा देणारे नागरिक, महिला बचत गट शासकीय नियम शासकीय कार्यालय यांचा सहभाग घेऊन दैनंदिन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे. अभियान यशस्वी करण्यासाठीचे नियोजन जल जिवन मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL