नाशिक, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
बेस्ट निवडणुकीत ठाकरे यांच्या विरोधात निकाल लागला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देखील ब्रँडचा करिश्मा चालणार नाही, अशी टीका जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी ठाकरे यांनी केली.
मंत्री महाजन छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान सेवा सप्ताह पंढरवाडयाच्या शुभारंभप्रसंगी बुधवार (दि.१७) नाशिकच्या
कालिदास कला मंदिर येथे आले असता, पत्रकारांनी त्यांच्याशी सवांद साधला. स्व. इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा, उद्दिष्ट आणि कर्तुतव भिन्न विचारांचे होते. त्यांची पुढील पिढी आम्ही ब्रँड आहे, असे म्हणत असेल तर,असे कधी होत नाही. गांधी प्रमाणेच ठाकरे ब्रँडही नामशेष होत आहे. काँग्रेस आणि शरद पवारांसोबतही सत्ता स्थापन करायची, हिरवे झेंडेही फडकायचे, असे लोकांना चालत नसल्याचे सांगत मुंबईचा महापौर हा महायुतीचाच बसेल असा दावाही मंत्री महाजन यांनी यावेळी केला. ठाकरे यांच्या दुट्टपी भूमिकेमुळे जनताच त्यांना ठाकरेंना धडा शिकवणार आहे. मुंबईत स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने शाईफेक केली. या घटनेप्रकरणी पोलीस तपास करत असून निंदनीय घटना असल्याचे महाजन यावेळी म्हणाले. हा सर्व प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला, की कोणी विकृत माणसाने केला, हे तपासाअंती समोर येईलच. त्यानुषंगाने पोलीस तपास करतील आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असेही महाजन यावेळी म्हणाले.
.... शरद पवारांनी सतेत असताना काय केले?
निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन विरोधक आता आंदोलने, मोर्चे काढत आहे. सतेते असतांना काहीच करायचे नाही आणि विरोधात बसल्यानंतर मोर्चे काढायचे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने मदत देण्याचे काम सुरु आहे. शरद पवारांनी सतेत असताना काय केले? असा प्रश्न उपस्थित करीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पवार यांनी बोलूच नये, असा सल्लाही मंत्री महाजन यांनी पवार यांना यावेळी दिला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना अडीच वर्ष घरात बसून होते. टाळूवरचे लोणी खाण्याचे काम त्यांनी करीत महापालिकेत भ्रष्टाचार केला. त्यामुळे जनता त्यांना येणाऱ्या निवडणुकामध्ये दूर ठेवतील, असे महाजन म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV