तलासरीत टेम्पो चोरी प्रकरणात एकाला अटक
पालघर, 17 सप्टेंबर (हिं.स.)। पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या टेम्पो चोरी प्रकरणात पोलिसांनी एक आरोपीला अटक करून चोरीस गेलेला 22 लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. ७ सप्टेंबर रोजी फिर्यादी रामआश्रम यादव
टेम्पो चोरी प्रकरण; पालघर पोलिसांची यशस्वी कारवाई


पालघर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।

पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या टेम्पो चोरी प्रकरणात पोलिसांनी एक आरोपीला अटक करून चोरीस गेलेला 22 लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

७ सप्टेंबर रोजी फिर्यादी रामआश्रम यादव यांना साबण भरण्यासाठी तलासरी येथे बोलावण्यात आले होते. त्यानंतर मौजे दापचरी येथे दोन इसमांनी फिर्यादीचा टेम्पो थांबवून चावी काढून घेतली व फिर्यादीस कारमध्ये बसवून गुजरातकडे घेऊन गेले. मात्र, जेवणासाठी हॉटेलवर थांबल्यावर फिर्यादीने अंधाराचा फायदा घेत पळ काढला व मालकाला घटनेची माहिती दिली. यावरून तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान कोणताही पुरावा नसताना गुप्त माहिती व तांत्रिक साधनांच्या आधारे पोलिसांनी आरोपी ख्वजनील मकर डुमाडा (रा. उसगाव, वसई) याला १४ सप्टेंबर रोजी अटक केली. चौकशीत त्याने साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली. न्यायालयाने त्याला १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला टेम्पो जप्त करण्यात आला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरखळे व उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या पथकाने केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande