नाशिक, 17 सप्टेंबर (हिं.स.)पंचवटी परिसरातील फुलेनगर जवळील राहुल वाडी येथे एका युवकावर पूर्ववैमानास्यातून गोळीबार करण्यात आला असून हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी अपोलो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त मध्ये वाढ केली असून आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आलेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पंचवटी परिसरामध्ये असलेल्या फुलेनगर जवळ राहुल वाडी हा परिसर आहे . या ठिकाणी मंगळवारी(दि.१६) रात्री सर्वसाधारण एक ते सव्वा वाजेच्या सुमारास या परिसरात राहणारा सागर विठ्ठल जाधव हा युवक परिसरात असलेल्या मंगला चंद्रकांत भवर यांच्या ओट्यावरती इतर सहकाऱ्यांसोबत बसलेला होता. या ठिकाणी पूर्ववैमानास्यातून असलेल्या भांडणातून याच परिसरात राहणारे विकी उत्तम वाघ आणि विकी विनोद वाघ या दोघांसह त्यांच्या अन्यसाथीदारांनी या ठिकाणी येऊन सागर विठ्ठल जाधव यांच्यावर अचानक पणे गोळीबार केला. या गोळीबारामध्ये सागर जाधव यांच्या गालातून गोळी ही आरपार गेली आहे तर दुसरी गोळी ही माने मध्ये अडकून पडल्यामुळे तिची प्रकृती ही चिंताजनक आहे. गोळीबार केल्यानंतर विकी उत्तम वाघ व विकी विनोद वाघ आणि त्यांचे साथीदार हे या ठिकाणावरून पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली पोलिसांनी तातडीने जखमी असलेल्या सागर विठ्ठल जाधव याला नातेवाईकांच्या मदतीने अपोलो रुग्णालयामध्ये दाखल केले आले आहे या ठिकाणी तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तातडीने या ठिकाणी परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलिस आयुक्त संगीता निकम पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सुनील पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील ,सचिन शिरसाट, व अन्य पोलीस कर्मचारी दाखल झाले असून या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी बंदोबस्त मध्ये वाढ करण्यात आली असून आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथक पाठविण्यात आलेले आहे. पंचवटी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV