अकोला, 18 सप्टेंबर (हिं.स.) : राज्य सरकारने हैद्राबाद गेझिटियर लागू करून मराठा समाजाला ओबीसी समाज आरक्षणात घुसखोरी सुरु केली आहे आणि हा प्रकार ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. याला थांबवीण्यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने सोमवार 15 सप्टेंबरपासुन जनार्दन हिरळकर, शंकर बापूरावं पारेकर, पुष्पाताई गुलवाडे, राजेश माणिकराव ढोमणे, ऍड. भाऊसाहेब विठ्ठलराव मेडशिकर या पाच प्रतिनिधिनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले असून आज चवथ्या दिवशी यातील उपोषण कर्ते राजेश माणिकराव ढोमणे,जनार्दन हिरळकर, शंकर बापूरावं पारेकर यां तिघांची प्रकृती खालवली आहे. तर यातील राजेश माणिकराव ढोमणे यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. उर्वरित दोघांनी औषधोपचार घेण्यास नकार दिला असल्यामुळे समर्थकांमध्ये चिंता पसरली आहे. आजही अनेक संघटना आणि नेत्यांनी भेटी देत आमरणाला समर्थन दिले. यामध्ये आमदार साजिद खान पठाण यांनी उपोषण मंडपाला भेट देत उपोषणकर्ते यांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली.
ओबीसी समाजाला धैर्य देण्यासाठी कायदेशीर मार्गाने ओबीसी समाजात येणाऱ्या ओतारी, डोबारी, छप्परबंद मुस्लीम, माकडवाले, लभाणी, वेरड, रामोशी, मुस्लीम शाहा, मुस्लीम मदारी, मन्नेवार, बागवान व ओबीसी मध्ये समाविकोल्हाटी, नंदीवाले, वासुदेव, बहुरूपी, गारपगारी, जवेरी, कासार, भांड, छप्परभांड, मानभाव, परदेशी, लोथी आगरी, गुजर, भुते, मैराळ, वैद्, बाव्छप्परबंद, इराणी, ठाकूर, चितारी, काशीकापडी, गुरव, झिंगाभोई, मसनजोगी, फुलारी, गोपाळ, शिकलगार, वडार, राजपूत, भामटा, बेरड, गारू्डी,गोसावी, यादव, गवळी, रंगारी, बारी, लोणारी, लोहार, साळी, कलाल, भराडी, चित्रकथी, सुतार, गोवारी, हलया, नाथजागी, जोगी, मदारी, कैकार्डी,कुणबी, माळी, धनगर, तेली, वंजारी, बंजारा, कुंभार, धोबी, न्हावी, भोई, बेलदार, सोनार, कोळी, कोष्टी, शिंपी, भावसार, गोंधळी या जातींचे 5 प्रतिनिधीनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाच्या माध्यमातून लढा सुरु केला आहे.आंदोलन सरकार दप्तरी पोहचण्यासाठी लाखोच्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हा.! असे आवाहन समस्न ओ.बी.सी. समाज अकोला जिल्हा यांनी केले आहे.
आज अकोला जिल्हा सकल ओबीसी च्या वतीने. जिल्हाधिकारी यांना उपोषणाच्या समर्थनार्थ निवेदन दिले. यावेळी माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आम. नारायण गव्हाणकर, प्रा. डॉ संतोष हुशे, विजय कौशल, अमोल पाथरकार, आत्मराम म्हात्रे,परशराम बंड,श्रीकांत ढगे कर, संतोष सरोदे, गोविंद इंगोले, सुभाष सातवं आदिसह अनेकांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे