अकोला, 18 सप्टेंबर (हिं.स.) : पेट्रोलसोबत बोनस पॅक – मोफत पाणी.अकोल्यातील माउंट कारमेल शाळा चौकातील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांना भन्नाट ऑफर मिळाली आहे. १ लिटर पेट्रोल खरेदी करा आणि मिळवा अर्धा लिटर पाणी मोफत अशा धडाकेबाज योजनेने वाहनधारक थक्क झालेत.वाहनधारकांचा आरोप आहे की पेट्रोल टाकीत पेट्रोलपेक्षा पाण्याचं प्रमाण जास्त मिळतंय.काहींची गाडी पेट्रोलऐवजी ‘नळी पंप’ मोडवर चालू लागली तर काहींनी तर गाडीला थेट कुलर लावण्याचा विचार सुरू केला आहे.ग्राहक म्हणत आहे की पेट्रोल पंपावर आता टाकी फुल्ल केल्यावर गाडी पेट्रोलवर कमी आणि पोहण्याच्या स्विमिंग पूलवर जास्त धावेल असं दिसतंय!”
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मात्र स्पष्टीकरण दिलं –या नव्या ‘इंधन-पाणी’ मिश्रणामुळे वाहनधारक गोंधळले असले तरी पंपचालक मात्र खुश – कारण आता त्यांचा पंप “ऑईल + मिनरल वॉटर” सेंटर म्हणून ओळखला जाईल. आता पेट्रोल पंपावर गाडीच्या टाकीत पेट्रोल सोबत पाणी असल्याची तक्रार करणाऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे. मात्र पेट्रोल मालकांनी ग्राहकांना गाडी दुरुस्त करून पेट्रोल टाकी फुल करून देण्याचा आश्वासन दिला आहे. एवढी मोठी चूक पेट्रोल पंप चालकाकडून झाली असून ग्राहकांना नाहक त्रास यामुळे सहन करावा लागला आहे, आता पेट्रोल कंपनी यावर काय कारवाई करते यावर आता लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे