'अनुपमा' टीआरपीसह पहिल्या स्थानावर कायम
मुंबई, 18 सप्टेंबर (हिं.स.)। ३६व्या आठवड्याच्या टीआरपी अहवालात फारसा बदल पाहायला मिळाला नाही.‘अनुपमा’ २.४ टीआरपीसह पहिल्या स्थानावर कायम आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ जो गेल्या आठवड्यात चौथ्या स्थानी होता, तो आता २.० टीआरपीसह पुन्हा टॉप २ मध्ये
'अनुपमा' टीआरपीसह पहिल्या स्थानावर कायम


मुंबई, 18 सप्टेंबर (हिं.स.)। ३६व्या आठवड्याच्या टीआरपी अहवालात फारसा बदल पाहायला मिळाला नाही.‘अनुपमा’ २.४ टीआरपीसह पहिल्या स्थानावर कायम आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ जो गेल्या आठवड्यात चौथ्या स्थानी होता, तो आता २.० टीआरपीसह पुन्हा टॉप २ मध्ये परतला आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ हा शो याही आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या शोची टीआरपी १.९ आहे.

टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ याने या आठवड्यात टॉप १० मध्ये आपली जागा बनवली आहे. शरद केळकर अभिनीत ‘तुम से तुम तक’ या शोला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठवड्यात हा शो पाचव्या क्रमांकावर होता, पण या आठवड्यात तो चौथ्या स्थानी पोहोचला आहे. या शोची टीआरपी १.८ आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ जो गेल्या आठवड्यात दुसऱ्या क्रमांकावर होता, तो आता १.८ टीआरपीसह पाचव्या स्थानी आला आहे. या आठवड्यात ‘उडने की आशा’ १.६ टीआरपीसह सहाव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कलर्स टीव्हीचे ‘मंगल लक्ष्मी’ आणि ‘लक्ष्मी का सफर’ हे शो अनुक्रमे सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही शोची टीआरपी १.४ आहे.

आता टॉप १० मध्ये ‘बिग बॉस सीझन १९’ देखील सामील झाला आहे. या रिअॅलिटी शोची टीआरपी १.४ आहे आणि हा शो नवव्या स्थानी आहे. हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की ‘बिग बॉस १९’ टॉप १० मध्ये टिकून राहतो का नाही.

दहाव्या क्रमांकावर झी टीव्हीचा ‘वसुधा’ हा शो आहे, ज्याची टीआरपी १.३ आहे. हा शो सातव्या क्रमांकावरून खाली घसरून दहाव्या स्थानी आला आहे. गेल्या आठवड्यात ‘आरती अंजली अवस्थी’ आठव्या स्थानी आणि ‘शिव शक्ती’ दहाव्या स्थानी होते, पण या आठवड्यात हे दोन्ही शो टॉप १० मध्ये नाहीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande