परभणी, 18 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मिरखेल येथील सौ. रुक्मिणीबाई आंबोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश सोपानराव कदम याने प्रथम तर श्री शिवाजी कला महाविद्यालयाच्या अलका लक्ष्मण खाडे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित बक्षिस वितरण समारंभात विजेत्या स्पर्धकांना बक्षिस पालकमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. वीर सावरकर विचार मंचच्या वतीने या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ही स्पर्धा इयत्ता १० वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. यंदा ‘साहित्यिक सावरकर’ असा स्पर्धेचा विषय ठेवण्यात आला होता.स्पर्धेत ज्ञानोपासक विद्यालय, बोरी येथील समर्थ नितीन पतंगे याने तृतीय क्रमांक मिळवला. श्री नृसिंह कला महाविद्यालय, ताडकळसची कु. श्रुती बालाजी संवडकर व कु. दिपाली यशवंत माने यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय, पाथरीची कु. योगेश्वरी विनोद पाठक हिला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही परभणी येथील वीर सावरकर मंचाच्यावतीने मंगळवारी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वीर सावरकर विचार मंचचे अध्यक्ष राजेंद्र मुंढे, कार्याध्यक्ष मधुकरराव गव्हाणे, डॉ. नवीनचंद्र मोरे, अॅड. रमेशराव दुधाटे गोळेगावकर, विजय अग्रवाल, राजेश देशपांडे, भगवान देसाई, संजय रिझवानी, ज्ञानोबा मुंडे, शिवराज नाईक, अनुप शिरडकर, संतोष पवार, विनायक पिसाळ, टी. एम. कुलकर्णी व बळवंतराव खळेकर, प्रतापराव देशपांडे, विनोद डावरे यांच्यासह वीर सावरकर विचार मंचच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती. स्पर्धेत जिल्ह्याभरातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis