जिल्हा युवा पुरस्कारासाठी २५ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, 18 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्र व राज्याच्या निर्मितीत युवकांची महत्वाची भूमिका असून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार योजना राबविण्यात येते. इच्छुकांनी २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करण्याचे
जिल्हा युवा पुरस्कारासाठी २५ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


मुंबई, 18 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्र व राज्याच्या निर्मितीत युवकांची महत्वाची भूमिका असून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार योजना राबविण्यात येते. इच्छुकांनी २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

सन २०२४-२५ या वर्षी राज्यस्तरावर प्रत्येक विभागातून एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांची निवड केली जाणार आहे. पुरस्काराचे स्वरूप युवक-युवतींना रोख ₹१०,०००/-, संस्थेला ₹५०,०००/-, गौरवपत्र व सन्मानचिन्ह असे राहणार आहे. गत तीन वर्षांत केलेल्या सामाजिक कार्याचा विचार करून निवड केली जाणार असून इच्छुकांनी २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत, तीन पासपोर्ट फोटो जोडून बंद लिफाफ्यात खालील पत्त्यावर पाठवावेत.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, समता नगर पोलीस ठाणे शेजारी, आकुर्ली रोड, संभाजीनगर समोर, कांदिवली (पूर्व), मुंबई.

अधिक माहितीसाठी ०२२-२०८९०७१७ या क्रमांकाशी संपर्क साधावा. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर तसेच संकेतस्थळावर sports.maharashtra.gov.in. उपलब्ध आहे.

मुंबई उपनगरातील युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांनी प्रस्ताव वेळेत सादर करावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी आवाहन केले असून राज्यातील जास्तीत जास्त संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande