नांदेड, 18 सप्टेंबर (हिं.स.)।
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने देगलूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्या उपस्थितीतन देगलूर पंचायत समितीत विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात येत असून, याच अनुषंगाने देगलूर पंचायत समिती येथे या अभियानांतर्गत, पाणंद रस्त्यांबाबत महत्त्वपूर्ण विषयांवर सभागृहात सविस्तर चर्चा करण्यात आली. या मोहिमेमध्ये पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण
ज्या पाणंद रस्त्यांची नोंद निस्तार पत्रक / वाजवी उल अर्जामध्ये नाही, त्यांची नोंद घेणे
शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी सहमती पत्र घेणे
शेत रस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतांपर्यंत सहज पोहोचता येईल व शेतीच्या दृष्टीने सुविधा प्राप्त होतील. या कामासाठी प्रशासन व संबंधित विभागासोबत समन्वय साधून योग्य ती कार्यवाही केली जाईल.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis